हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “आमदारांचा घोडेबाजार महाराष्ट्रात सुरू आहे. पोलीस महासंचालक यांना विनंती आहे, की त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेऊन बाजार मांडणाऱ्यांवर कारवाई करावी. निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो गुन्हा आहे. मात्र अशाप्रकारे आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक श्रीधर पाटणकर, राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्री जी होम्स बनवली, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्याकडून आज नाशिक जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सचिन वाझेला सीबीआयने माफीचा साक्षिदार होण्यास मंजुरी दिली आहे. तसेच बजरंग खरमाटेही जर माफीचा साक्षिदार झाले आपल्या अडचणी वाढणार हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. आणि दापोलीच्या रिसॉर्टचे पैसे कोणी दिले, सचिन वाझेच्या वसुलीमधून कॉन्टॅक्टरचे पैसे दिले, असे जर वाझेंनी सांगितले तर तुमचे काय होणार उद्धव ठाकरे, असा सवाल सोमय्या यांनी केला.
‘श्रीजी होम कोणाची?’
यावेळी सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना अस्वलही केला आहे. शिवाजी पार्कसमोर उभी असलेली रिकामी इमारत असलेली श्रीजी होम कोणाची आहे?, असा सवाल करत ईडीकडे सगळी कागदपत्रे दिली आहेत. श्रीजी होम्स कंपनी अजूनही रजिस्टर झालेली नाही. उद्धव ठाकरे, त्यांचे नातेवाईक श्रीधर पाटणकर, राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्री जी होम्स बनवली, असा आरोप सोमय्या यांनी केला.