हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राऊतांच्या आरोपांवर पलटवार केला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा, असे सांगितले होते. त्यांचे बंगले मी दाखवणार नाही. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही. त्याबद्दल मी तक्रार केली आहे. त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबांनी बोलावे, आता उध्या मी पुन्हा त्या 19 बंगल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी बघायला जाणार आहे,” अशी माहिती सोमय्या यांनी दिली.
किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेचे इंटरनल राजकारण मला समजत नाही. मात्र राऊत अडचणीत आले आहेत. त्यांना धास्ती वाटत आहे. मी दिल्लीला जाऊन या प्रकरण विरोधात तक्रार करुन आलो आहे. आता हे राऊतांनी हे प्रकरण रश्मी ठाकरे, त्यांच्या भावाच्या गळ्यात टाकले आहे. अन्वय नाईकने 2008 ला ग्रामपंचायतीकडे घरं बांधण्यासाठी अर्ज केला. 2009 ला घरं बांधून झाली. 2013 मध्ये उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात करार झाला. असेही यावेळी सोमय्या यांनी सांगितले.
दरम्यान, मी उद्या कोर्लई गावात जाणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तेथील ग्रामपंचायतीला भेट देणार आहे. तसेच त्या ठिकाणी जो जमीन, गारांचा घोटाळा झाला आहे, त्याची माहिती मी घेणार आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.