“…अन् किरीट सोमय्यांनी स्वतः च्याच थोबाडीत मारली”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली होती. असे सांगत असताना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक खोटं बोलत होते का? असे सुरुवातीला म्हंटले. मात्र, आपण एका मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल बोलत असल्याचे सोमय्या यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत: च्या थोबाडीत मारुन घेतली.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून आज कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवरील १९ बंगल्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली जाणार आहे. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यापूर्वी केलेल्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासनाकडे विचारणा करणार आहेत.

नेमके किरीट सोमय्या काय म्हणाले?

आज सकाळी सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सप्टेंबर 2020 पासून पाठपुरावा करत आहे. गावातील लोकांनाही समजून घ्यायचे आहे. आज कोर्लई या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी बंगले आहेत की नाहीत हे समजून घ्यायचे आहे. मुख्यमंत्री आणि ठाकरे परिवार खोटे बोलू शकत नाही. तिथला सरपंच काय बोलतो ते महत्त्वाचे नाही. जानेवारी त्यांच्या कुटुंबीयांनी अर्ज भरला होता. अन्वय नाईक 2009 पासून कर भरत आहेत. अन्वय नाईक खोट बोलत होते. अन्वय नाईक चिटिंग करत होते, असे किरीट सोमय्यांनी म्हंटले.