Kirit Somaiya Viral Video : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. त्याचे अशा अवस्थेतील तब्बल ३५ व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या त्याच्या या व्हिडीओमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केली आहे.
मुख्य म्हणजे, या प्रकरणी आता सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया देत, आपण कोणत्याही महिलेवर अत्याचार केले नसल्याचे म्हटले आहे. यासंबंधी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोपी फेटाळून लावले आहेत. त्याचा एक व्हिडीओ एका मराठी चॅनेलकडून व्हायरल करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीसांना सोमय्यांचे पत्र
यानंतर किरीट सोमय्या यांनी फडणवीस यांनी पत्र लिहीत म्हटले आहे की, आज एका मराठी वृत्तवाहिनी वरून माझी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात माझ्यावर जोरदार टीका केली जात आहे आणि त्यांनी माझ्यावर आरोप देखील घेतले आहेत. तसेच अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध असल्याचे देखील सांगितले जात आहे. मात्र मी कोणत्याही महिलांवर अत्याचार केलेला नाही. अनेक महिलांच्या या संबंधित तक्रारी आले आहेत त्यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत.
परंतु माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. ही व्हिडिओ क्लिप आणि त्यामागील सत्यता तपासावी अशी विनंती देखील सोमय्या यांनी केली आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मला ईडी, सीबीआयचा धाक दाखवून ब्लॅकमेल केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. “दुसऱ्यांवर चिखल उडवणारे सोमय्या स्वत: चिखलात लोळत आहेत. महिलांसोबत सोमय्या असे अश्लील प्रकार करत असतील तर त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही. याची गृहमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. भाजपने सोमय्यांची हकालपट्टी करावी” अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.