कारखाने लुटताना काही वाटलं नाही का?? सोमय्यांचा अजितदादांवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यासहित राज्यातील 5 साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. हे सर्व कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे समजत आहे. माझे नातेवाईक आहेत म्हणून धाड टाकली असेल, तर राज्यातील जनतेला विचार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या मालकाचे नाव सांगावं. अजित पवारांना आत्ताच कुटुंब का आठवलं. कारखाना लुटताना काही वाटलं नाही का?? आता साखर कडू वाटायला लागली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. जनतेची तक्रार आहे त्यामुळे घोटाळेबाजांवर कारवाई तर होणारच असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले-

छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे. मी कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही म्हणायच नाही. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल, तर राज्यातील जनतेला विचार केला पाहिजे. कुठल्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो. याचा राज्यातील जनतेने विचार करावा, असे अजित पवार म्हणाले.

Leave a Comment