मुंबई | उद्धवा अजब तुझे सरकार, देशद्रोही अस्लम शेख आता देशभक्त झाले, अशा शब्दात भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून सोमय्या यांनी अशी टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हंटले की, 2015 मध्ये काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी याकूब मेमन यांची फाशीची शिक्षा माफ करावी अशी मागणी केली होती. या मागणीला तीव्र विरोध करताना भाजप शिवसेनेने विधानसभा सभागृहाचे कामकाज 6 वेळा बंद पाडले होते. त्यावेळेस अस्लम शेख यांना देशद्रोही ठरवण्यात आले. आता अस्लम शेख उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री बनले आहेत.
किरिट सोमय्या यांचे शिवसेनेवर टीकास्त्र#hellomaharashtra@OfficeofUT @KiritSomaiya @ShivsenaComms pic.twitter.com/dZHdQdKe1r
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 31, 2019
काल झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. अस्लम शेख यांनी 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींना पत्र लिहून याकुब मेमनला फाशी देऊ नये अशी मागणी केली होती. अस्लम शेख यांचा समावेश आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात झाल्याने भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे.