मामाचा नादचं खुळा! कोल्हापूरात भाचा स्पर्धेत पहिला आला म्हणून मामाने केला चक्क गोळीबार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

धावण्याच्या स्पर्धेत भाचा जिंकल्याचा आनंद मामाने अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मामाने चक्क हवेत गोळीबार केल्याची आश्चर्यकारक घटना कोल्हापुरामध्ये घडली आहे. हवेत गोळीबार करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अश्विन शिंदे असे या मामाचे नाव आहे. शिंदे यांचा भाचा ५० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम आला. त्यामुळे शिंदे यांना प्रचंड आनंद झाला. ही बातमी समजल्यानंतर शिंदे हे मित्रमंडळींसोबत घराबाहेर आले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला.

मात्र, अचानक हा गोळीबार करण्यात आल्यामुळे गावातील लोक घाबरले होते. अनेक लोकांनी आपले दरवाजे बंद करून घेतले. यावेळी शिंदे यांनी हवेत गोळीबार करत असताना व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही होत असून पोलीस काय कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.