Komaki LY Pro : दोन बॅटरी असलेली ‘ही’ गाडी एका चार्जमध्ये देते 180 किमी पर्यंतची रेंज, किंमत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Komaki LY Pro : सध्याच्या पेट्रोल-डिझेलच्या महागाईच्या काळात इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. सरकारकडून यासाठी सबसिडी देखील मिळत आहे. इलेक्ट्रिक गाड्यामध्ये सर्वात मोठी समस्या बॅटरीची असते. ज्यामुळे गाडी विकत घेण्याआधी त्याची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर किती किलोमीटर चालते हे पाहिले जाते. आता Komaki या इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनीने लोकांची ही अडचण दूर केली आहे. कारण या कंपनीने नुकतीच आपली नवीन Komaki LY Pro स्कूटर बाजारात आणली आहे. याची खास बाब अशी कि, यामध्ये दोन बॅटरी देखील देण्यात आल्या आहेत.

komaki-new-electric-scooter-ly-pro-with-removable-dual-batteries-launched

कमाल वेग 62 किमी प्रतितास आहे

हे जाणून घ्या कि, Komaki LY Pro ही गाडी एका बॅटरीच्या चार्जवर 85 किमी तर दोन्ही बॅटरीच्या चार्जवर एकाच वेळी 180 किमीचे अंतर कापू शकते. ही यामध्ये 62 kmph चा टॉप स्पीड देण्यात आला आहे. तसेच याच्या दोन्ही बॅटरी अवघ्या पाच तासांतच पूर्णपणे चार्ज होतील. रस्ते अपघात रोखण्यासाठी यामध्ये एण्टी स्किड तंत्रज्ञान दिले गेले आहे. यासोबतच 12 इंच ट्यूबलेस टायर देखील उपलब्ध आहेत.

आ गया दो बैटरी वाला स्कूटर एक बार फुल चार्ज में 180 Km तक रेंज

तीन गियर मोड्स उपलब्ध

Komaki LY Pro या गाडीमध्ये दिलेली बॅटरी 62V 32AH पॉवरची आहे. जी ड्युअल चार्जर वापरून जलद गतीने चार्ज करता येतील. तसेच यामध्ये टीएफटी डिस्प्ले असून, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, साउंड सिस्टिम, ब्लूटूथ, कॉलिंग ऑप्शन, थ्री गिअर मोड सारखे फीचर्सही दिले गेले आहेत. ही गाडी 1,37,500 लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

Komaki Electric launches two high-speed e-scooters; prices start atINR  88,000, Auto News, ET Auto

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://komaki.in/

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर