कोयना परिसरात 3 रिश्टर स्केलचे दोन भुकंप; स्थानिकांच्यात घबराटीचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

सातारा : जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास भूकंपाचे 2 धक्के जाणवले. यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले आहेत. हे भुकंपाचे हादरे 3 रिश्टर स्केलचे असल्याचे समजत आहे.

कोयना धरण क्षेत्रात आज (शनिवारी) दुपारी 1:55 मिनिटांनी पहिला भूकंप 2.9 रिश्टर स्केल इतका होता, तर दुसरा भुकंप 1:57 मिनिटांनी 3.00 रिश्टर स्केल होता. या भूंकपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यातील जावळे गावच्या वायव्येला आठ किलोमीटरअंतरावर होता. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग यांनी दिली आहे.

Leave a Comment