बंगरुळु | कुमार स्वामी यांच्या सत्तेचा सूर्य भर दुपारी मावळला असताना आता त्यांच्या पक्षात देखील दोन गट पडले आहेत. जेडीएस पक्षाच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे पक्षाला सुचवले आहे. तर काही आमदारांनी विरोधी बाकावर बसून सरकारला विरोध करून पक्ष मजबूत करण्यास भर देण्यासाठी सांगितले आहे. आता अशा दुहेरी पेचात कुमार स्वामी नेमका काय निर्णय घेणार हे बघण्यासारखे राहणार आहे.
शुक्रवारी कुमार स्वामी यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत आमदारांमध्ये दोन सूर बघायला मिळाले. त्यामुळे पक्ष नेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झालं आहे. या पेचातून कुमार स्वामी यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कुमार स्वामी यांच्या सरकारला उतरती कळा लागण्याचे कारण हे की त्यांच्या पक्षांतर्गत असणारी बंडाळी ते क्षमवू शकले नाही. त्यामुळे अधिक वाताहत होण्यापेक्षा आपण भाजपला पाठिंबा देऊ असे उद्दिष्ट कुमार स्वामी यांनी ठेवले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी शपथ घेतली आहे. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून चौथ्यादा शपथ घेतली आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांनी बंडखोरी केल्याने जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार पडले होते. बहुमत चाचणीत जडीएस सरकारच्या बाजूने ९९ तर विरोधात १०५ असे मतदान झाले होते.