कुर्लामध्ये 4 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना! ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 15 जणांना वाचवण्यात यश

building collapse
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील कुर्ला पूर्व येथील शिवसूष्टी रोड या ठिकाणी एक चार मजली इमारत सोमवारी रात्री उशिरा कोसळून (building collapse) मोठी दुर्घटना झाली. इमारत कोसळून (building collapse) अनेकजण खाली दबले गेले होते. या इमारतीमध्ये (building collapse) 20-25 जण राहत असल्याची माहिती सामोर आली आहे. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात यश आले आहे तर अजून 5 ते 6 लोक दबले गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

लोकं झोपेत असताना पत्त्यासारखी कोसळली इमारत
सोमवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही धोकादायक इमारत होती. तरिही या इमारतीत कुटुंब वास्तव्य करत होती. या इमारतीत राहत असलेली लोकं सोमवारी रात्री झोपेत असताना ही इमारत पत्त्यासारखी कोसळली(building collapse). त्यामुळे कुणालाच जीव वाचवण्यासाठीची संधीही मिळू शकली नाही. महानगरपालिकेतर्फे ही इमारत खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती तरीदेखील लोक या ठिकाणी राहत होते.

ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता
या दुर्घनटनेत अनेकजण मलब्याखाली अडकलेय. इमारत कोसळल्याचा (building collapse) आवाज झाल्यानं आजूबाजूला एकच गोंधळ उडाला होती. याबाबतची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्यास सुरुवात केली. सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 15 ते 18 लोकांना वाचवण्यात यश आले होते. तर अजूनही पाच ते सहा लोकं अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेत (building collapse)अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन

मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू