Lalbaugcha Raja Live : घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन; इथे दिसतंय थेट प्रक्षेपण

Lalbaugcha Raja Live
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lalbaugcha Raja Live । नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागचा राजा हा प्रसिद्ध आहे. पूर्वी कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख होती. आता कोट्यावधी भाविकांसाठी नवसाला पावणारा हा लालबागचा राजा आहे. लालबागचा राजा हा आता कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून मुंबईत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. लालबागचा राजा जवळ आपली इच्छा व्यक्त केल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी मस्तक टेकवण्यासाठी भाविकांची अफाट गर्दी असते.

आज सर्वत्र गणरायाचे आगमन झाले असून मुंबईच्या लालबागच्या राजाची झलक पाहण्यासाठी भाविक मुंबईला जात आहेत. परंतु ज्यांना काही कारणाने मुंबईला जाणे शक्य नाही अशा भाविकांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही. या वर्षाच्या लालबागच्या राजाची पहिली झलक भाविक भक्तांना लाईव्ह (Lalbaugcha Raja Live) बघायला मिळणार आहे. राजाच्या मंडळाच्या लिंक वरच तुम्हाला लालबागच्या राजाचे दर्शन होईल. त्यासाठी आयोजकांनी वेबकॅम आणि लाईव्ह स्ट्रीमिंग च्या माध्यमातून लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन घेण्यासाठी व्यवस्था केली आहे. जेणेकरून लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जगभरातील भाविक भक्तांना लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन घेता येईल.

यंदाच्या गणेश चतुर्थी दरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनाची सुरुवात 19 सप्टेंबर 2023 पासून सकाळी चार वाजता आरतीने करण्यात आली आहे. यासोबतच 28 सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत दर्शन रांग आणि लालबागच्या राजाचे मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून लालबागच्या राजाचे दर्शन प्रत्येकाला घेता येईल. त्याचबरोबर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आजपासूनच मोठी गर्दी बघायला मिळत आहे. एवढेच नाही तर कालपासून हजारो भाविक नवसाच्या रांगेमध्ये उभे असून नवसाला पावणाऱ्या राजाच्या मंडपात भाविकांची गर्दीच गर्दी दिसत आहे. पोलिसांनी या ठिकाणी काटेकोर बंदोबस्त ठेवला असूनलालबागच्या राजाचे मंडळ पूर्णपणे उत्साह जल्लोषाने सुशोभीत झाले आहे.

खालील वेबसाईट वरून घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन (Lalbaugcha Raja Live)

मंडळाची अधिकारीक वेबसाईट http://lalbaugcharaja.com/en/

यूट्यूब चैनल https://youtube.com/user/LalbaugRaja

फेसबुक पेज https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इंस्टाग्राम https://Instagram.com/lalbaugcharaja

ट्विटर https://twitter.com/lalbaugcharaja