सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मशिदीवरील भोंगे काढून टाका असे म्हणून भारतीय घटनेविरोधात काम करणाऱ्या व दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांना तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ठाकरे घराण्यात जन्म झाला असला तरी त्यांचे देशाच्या जडणघडणीत काेणतेही योगदान नाही. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. खरंतर राज ठाकरेंनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीचा आदर्श घेतला पाहिजे. परंतु राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करत आहेत. त्यांनी कोणाची सुपारी घेतली आहे, हे सर्वजण जाणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय संवेदनशील परिस्थितीवर एक शब्द देखील बाेलत नाहीत. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा.
भोंगे काढले नाहीत तर आम्ही तलवारी काढू असे वक्तव्य करणा-या राज ठाकरेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा हाेता. मात्र तसं झाले नाही. त्यामुळे मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण भावाची समजूत काढावी अन्यथा घटनात्मक विधिमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हे पण वाचा –
धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या ‘त्या’ महिलेला अटक; दुसरी तिसरी कोणी नसून…..
PPF आहे खूपच कामाची गोष्ट, कर्जही मिळतं अन टॅक्स मध्ये सूटदेखील; जाणून घ्या या 10 गोष्टी
मोहाच्या दारूला विदेशी दर्जा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले 6 मोठे निर्णय