हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि ठाण्यातील असलेल्या पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आदेशाला 12 तासात स्थगिती देण्यात आली आहे. गृह खात्याच्या या निर्णयाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “गृह खात्याने ज्या अधिकाऱ्याच्या पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. यामागचे खरे कारण काय हे पाहिले पाहिजे. मुख्य म्हणजे अधिकाऱ्यांच्या बदल्या का केल्या? वसुली रॅकेटमुळे तर त्यांच्या बदल्या केल्या नाही ना?, असा सवाल यावेळी फडणवीसांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ,ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आदेशाबाबत राज्य सरकारने रात्री पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून सकाळी त्याला स्थगिती दिल्याची चिन्हे दिसत आहेत. यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
या बदल्यांचे आदेश मागे घेण्यामागे नक्की काय कारण आहे? यात प्रशासकीय चुकी आहे कि कोणाचा यामागे हात आहे? मागील वेळेसही असाच प्रकार घडला होता. अशाच प्रकारे १० डीसीपीचे आदेश थांबवले होते. नंतर ते बदली घोटाळ्यात आले. आताही तसाच काहीसा प्रकार तर घडला नाही ना. याचा मात्र, शोध घेतला पाहिजे, असेही यावेळी फडणवीस यांनी म्हंटले.
आम्ही त्यांची पोलखोल हि करणारच
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. भाजपकडून पोलखोल यात्रा काढली जात आहे. या यात्रेवर हल्ला करण्यात आला. पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक करण्यात आली. आमच्या यात्रेवर कितीही हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही आणि पोलखोल हि करणारच, असा इशारा यावेळी फडणवीसांनी दिला.