हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. तसेच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या विरोधात आक्रमक पावित्रा घेत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत हल्लाबोल महामोर्चा काढणारच असा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काहीही झाले तरी मुंबईत हल्लाबोल महामोर्चा निघणारच, असा इशारा दिला तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकने नेहमी सीवादाचा प्रश्न चिघळला अशी टीका केली.
राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर तिन्ही आघाडीतील नेत्यांनी कंट्री पत्रकार परिषद घेत महामार्चाबाबत माहिती दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दोन्ही राज्याच्या बैठक घेतली. या बैठकीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले कि माझे ट्विटर अकाउंट हॅक केले. त्याचा शोध घेण्याची गरज आहे. आम्ही आजच्या बैठकीत सर्वांनी निर्णय घेतला आहे कि कोणत्याही परिस्थितीत महामोर्चा काढणार आहोत. आम्ही शांततेच्या मार्गाने महामोर्चा काढणार आहोत. आमची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप मोर्चाला परवानगी मिळालेली नाही ती लवकरच मिळेल.
तासली उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 15 मिनिटे वेळ देऊन दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र, त्याचा उपयोग काय झाला. आपल्याकडचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केवळ बैठकीत होला हो म्हणत होते. माना हलवत होते. त्यांनी परखड भूमिका मांडायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने अजूनही सीमावादाचा वाद मिटलेला नाही. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरणार आहोत. महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या महामोर्चात अनेक राजकीय पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत.
मग काल बैठकीत कांदे पोहे खायला गेला होता का?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधका. ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं का, हे लवकरच तपासात उघड होईल. मात्र, खुलासा करायला इतके दिवस का लागले? महाराष्ट्राच्या बसेसवर कर्नाटकात बंदी घालण्यात आली होती. हे सर्व ट्विटरवर झालं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी सजग असायलाचं हवं की, आपल्या ट्विटरवरून कोण काय बोलत आहे? तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता? सुप्रीम कोर्टात वाद असताना दोन्ही राज्याने बोलू नये, हा नवीन सल्ला नाही. सुप्रीम कोर्टाचं निकाल लागेपर्यंत महाराष्ट्राने थांबायचं का? कालच्या बैठकीत नवीन काय झालं? बैठकीत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस पोहे खाण्यासाठी गेले होते का? असा सवाल ठाकरेंनी यावेळी केला.