हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांना आपण सुंदर दिसावे वाटत असते. परंतु बदलत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. या हवामानामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात फरक दिसायला सुरुवात होते. शहरातील प्रदूषित हवामान, धूळ यामुळे आपल्या चेहऱ्यावर विशेषता नाकावर ब्लॅकहेड्स वाढतात. ब्लॅकहेड्स म्हणजे त्वचेवर येणारे छोटी छोटी छिद्र असतात जी आपल्या त्वचेवर असणारे हेअर फॉलिकल्स बंद झाल्यामुळे दिसतात. ही नाक, छाती, पाठ, येथे दिसतात.
अनेक वेळा चेहऱ्यावरील पुरळ आणि इतर डाग यामुळे चेहरा विद्रुप दिसायला सुरुवात होते. शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे आणि नाका जवळील तेल ग्रंथीमुळे ब्लॅकहेड्स वाढतात. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स वाढले कि चेहरा काळा दिसायला सुरुवात होते. ब्लॅकहेट्स कमी करण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही वारंवार पार्लरमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही या काही घरगुती उपाय आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेट्स कमी करण्यास मदत करतील. अनेक वेळा ब्लॅकहेड्स वाढू नये म्हणून स्क्रब केला जातो. तुम्ही घरगुती पद्धतीचा वापर करून सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स कमी करू शकता.
घरगुती करायचा उपाय
मध आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालून ते एकत्र मिक्स करा.
हे तयार झालेले मिश्रण नाकावर हळुवार हाताने चोळा.
कडीचा रस अथवा काकडीच्या पातीने चेहऱ्यावर काही वेळ मालिश करा.
आपोआप तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स कमी होतील
या स्क्रबचा ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी नक्की फायदा होईल. जर तुम्ही याचा दररोज वापर केला तर तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी मदत करते. तुम्ही जर नियमित मेकअप करत असाल तर ब्लॅकहेड्स वाढू शकतात. नेहमी झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचा मेकअप पूर्ण उतरवा. तसेच चेहऱ्यावरील रोमछिद्र बंद राहिल्याने ब्लॅकहेड्सना येण्याला संधी मिळते. म्हणून झोपण्यापूर्वी मेकअप काढा. ब्लॅकहेड्स साठी काकडी हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.