हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरण खूप गाजत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाचे आदेश एनसीबीच्या डीजींना दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर एनसीबीच्या डीजींनी राज्याच्या डीजींपीना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यातील महत्त्वाचे पाच ड्रग्ज प्रकरण एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमित शाह यांचे आदेश असल्याची माहिती देण्यात आलेली आहेत. शाह यांच्या आदेशानंतर एनसीबीच्या डीजींकडून केसेस वर्ग करण्यासाठी राज्याच्या डीजीपींना पत्र पाठवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एनसीबीच्या महासंचालकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकाचा एक पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात राज्यातील महत्त्वाच्या पाच ड्रग्जच्या केसेस एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश आहेत. गृहमंत्री अमित शाह यांचे आदेशानंतर एनसीबीच्या डीजीपींकडून केसेस वर्ग करण्यासाठी राज्याच्या डीजीपींना पत्र पाठविण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणं खूप गाजत आहेत. अशातच एनसीबीच्या महासंचालकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना 2 डिसेंबर रोजी पत्र पाठवले होते. या पत्रात NCB ला तपासासाठी कोणत्या केस पाहिजेत, त्याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. त्यासोबतच मुंबई ANC कडे असलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांपैकी तीन ते पाच प्रकरणे एनसीबीकडे वर्ग करण्यात यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.