मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. देशावर करोनाचे संकट असताना हे भूमिपूजन होत असल्यानं शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या प्राधान्य क्रमावर टिप्पणी केली होती. शरद पवारांच्या या टिप्पणीचा भाजपकडून निषेध करण्यात आला. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचं ठरवलं आहे. भाजपच्या या खेळीला उत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ (Jai Bhavani Jai Shivaji) असं लिहिलेली २० लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा केली होती. त्यास नायडू यांनी आक्षेप घेतला होता. त्याचा निषेध म्हणून ही पत्रे पाठवली जाणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला माहिती दिली.
‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणेला आक्षेप घेऊन नायडू यांनी महाराष्ट्रद्वेष दाखवून दिला आहे. भाजप नेत्यांच्या मनात शिवरायांबद्दल नेमक्या काय भावना आहे हेच यातून दिसून आलंय. याचा निषेध म्हणून आम्ही २० लाख पोस्टकार्ड नायडूंना पाठवणार आहोत,’ असं शेख यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”