पुढील महिन्यात येऊ शकेल LIC चा IPO, सरकारने केली सर्व तयारी

LIC IPO Date
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC च्या IPO ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सूत्रांनी CNBC-TV18 ला सांगितले की,” केंद्र सरकार मे महिन्याच्या सुरुवातीला LIC चा IPO आणण्यास तयार आहे.” ते म्हणाले की,” सरकार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) साठी बँकर्स आणि फायनान्शिअल ऍडव्हायझर्सच्या संपर्कात आहे. RHP हे असे डॉक्युमेंट्स आहेत जे IPO च्या लिस्टिंगसाठी कॅपिटल मार्केट रेग्युलेटर असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे सबमिट करणे आवश्यक आहे.

सूत्रांनी सांगितले की, या IPO च्या माध्यमातून सरकार LIC मधील 5 टक्क्यांहून जास्तीचे स्टेक विकण्याची ऑफर देऊ शकते. यापूर्वी, सरकारला गेल्या आर्थिक वर्षातच IPO लॉन्च करायचे होते, मात्र जागतिक अनिश्चिततेमुळे ते पुढे ढकलले गेले. अधिकारी आव्हानात्मक वातावरणात काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता बाजारातील अस्थिरता कमी झाल्यामुळे या IPO बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

यापूर्वी 8 मार्च रोजी सेबीने LIC ला IPO द्वारे फंड उभारण्याची परवानगी दिली होती. SEBI ला सादर केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) च्या मसुद्यानुसार, सरकार LIC चे 31 कोटी इक्विटी शेअर्स विकणार आहे. IPO चा एक भाग अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. पॉलिसीधारकांसाठी इश्यू साईजच्या 10% पर्यंत राखीव असेल.

78,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी LIC मधील 5 टक्के हिस्सा विकून 63,000 कोटी रुपये उभारण्याची सरकारची अपेक्षा होती. LIC चा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल. LIC या IPO मध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी करणार नाही. सध्या LIC मध्ये 100% सरकारचा सहभाग आहे. त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर आहे. LIC चा IPO हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO असेल. लिस्टिंग केल्यानंतर, LIC ची मार्केट कॅप रिलायन्स इंडस्ट्रीज आणि TCS सारख्या टॉप कंपन्यांच्या बरोबरीची असेल.

12 मे पर्यंत वेळ
SEBI कडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) च्या मसुद्यावर आधारित, हा IPO लॉन्च करण्यासाठी सरकारकडे 12 मे पर्यंतचा वेळ आहे. तोपर्यंत सरकारला IPO आणून नवीन कागदपत्रे दाखल करावी लागणार नाहीत. 13 फेब्रुवारी रोजी DHRP दाखल करण्यात आला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले, “सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे, आमच्याकडे IPO लॉन्च करण्यासाठी 12 मे पर्यंत वेळ आहे. आम्ही अस्थिरतेचे निरीक्षण करत आहोत आणि लवकरच प्राईस बँड निश्चित करताना RHP दाखल करू. SEBI कडे दाखल केलेल्या DRHP मध्ये सप्टेंबर 2021 पर्यंत LIC चे आर्थिक निकाल आणि अंतःस्थापित मूल्याचे तपशील आहेत.”

असे करता न आल्यास नवीन कागदपत्रांची आवश्यकता भासेल
12 मे पर्यंत हा IPO लाँच करण्यात सरकार अयशस्वी ठरल्यास, LIC ला डिसेंबर तिमाहीचे निकाल सांगून सेबीकडे नवीन कागदपत्रे दाखल करावी लागतील. तसेच एम्बेड केलेले मूल्य अपडेट करणे आवश्यक आहे. मिलिमन एडव्हायझर्सने 30 सप्टेंबर 2021 रोजी त्याचे एम्बेडेड मूल्य सुमारे 5.4 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. कंपनीमध्ये भागधारकांचे हित किती आहे, त्याचे एकत्रित मूल्य एम्बेडेड मूल्य असे म्हणतात. जरी DRHP LIC चे बाजार मूल्यांकन उघड करत नाही, मात्र इंडस्ट्री स्टॅन्डर्सनुसार, ते एम्बेडेड मूल्याच्या सुमारे 3 पट असेल.