“एक पैशाचाही भ्रष्टाचार केला नाही असे म्हणून नका, जनता तुम्हाला खुळ्यात काढेल”; चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबई व अलिबाग येथील संपत्तीवर ईडीने आज कारवाई करीत ती जप्त केली. यानंतर राऊतांनीही मी भ्रष्टाचार केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. “मी भ्रष्टाचार केला नाही असे म्हणू नका. तसे म्हणाल तर जनता तुम्हाला खुळ्यात काढेल,” असे पाटील यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राऊतांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राऊत गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रोज प्रवचन देत आहेत. त्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक असे शब्द वापरले आहेत. त्यामध्ये वापरलेले शब्द त्या शब्दावर एक पुस्तक तयार कण्याचे काम मी एकाला दिले आहे. ते पुस्तक मी जनतेसमोर मांडणार आहे.

माझ्या बाबतीत राऊतांनी जे काही शब्द वापरले आहरेत. त्याविषयी मी रश्मी ठाकरे व मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहले आहे. संजय राउतावर संस्कारच तशा पद्धतीचे झाले आहेत. त्याची संस्कृतीचं तशी आहे म्हणून ते तसे बोलत आहेत. घाण पाण्यात केली तर ती वर येतेच त्यामुळे चुकीचे काही केले तर ते बाहेर येणारच, असेही यावेळी पाटील यांनी म्हंटले.

Leave a Comment