हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPF Account : पगारदार कर्मचाऱ्यांना आपले EPFO मधील PF खाते पॅन कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. असे केले गेले नसल्यास त्यांना आता दुप्पट TDS भरावा लागू शकेल. EPFO ने जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, जर EPF खाते व्हॅलिड पॅन कार्डशी लिंक केले असेल तर TDS फक्त 10 टक्के दराने द्यावा लागेल. त्याच वेळी, जर EPF खाते व्हॅलिड पॅन कार्डशी लिंक केले गेले नसेल तर 20 टक्के दराने TDS द्यावा लागेल.
EPFO च्या या परिपत्रकात असेही म्हटले गेले आहे की, “जितका दिवस उशीर कराल, त्यासाठी 200 रुपये प्रति दिवस शुल्क आकारले जाईल. करपात्र उत्पन्न मिळवणाऱ्या प्रत्येक करदात्याने आयकर कायद्याच्या कलम 206AA अंतर्गत आपला EPFO ला पॅन नंबर देणे बंधनकारक आहे.” EPF Account
या परिपत्रकात असेही म्हटले गेले आहे की, जर PAN PF खात्याशी (EPF Account) लिंक केले गेले नसेल, तर खाली दिलेल्या दरांप्रमाणे टॅक्स आकारला जाईल (जे जास्त असेल):
(i) आयकर कायद्याच्या कलम 206AA च्या संबंधित तरतुदीमध्ये दिलेले दर
(ii) दराने किंवा लागू दराने
(iii) 20 टक्के दराने (कलम 194A आणि कलम 206AA)
अशा प्रकारे आपला पॅन EPF खात्याशी (EPF Account) लिंक करा…
स्टेप 1. सर्वप्रथम तुम्हाला EPFO UAN मेंबर सर्व्हिस पोर्टल https://epfindia.gov.in/site_en/index.php वर क्लिक करावे लागेल.
स्टेप 2. आता मेन मेनूमध्ये येथे क्लिक करा.
स्टेप 3. आता यानंतर KYC वर क्लिक करा.
स्टेप 4. येथे तुम्हाला पॅन कार्ड निवडावे लागेल आणि पॅन नंबर टाकावा लागेल.
स्टेप 5. यानंतर तुमचे PF खाते पॅन कार्डशी लिंक केले जाईल.
हे पण वाचा :
EPF: नॉमिनेशन न करताही करता येतो क्लेम, त्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल हे जाणून घ्या
EPFO कडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करता येणार
EPFO ने ग्राहकांना दिली मोठी सुविधा, आता घरबसल्या इतर खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करता येणार
EPFO शी पॅन लिंक करून वाचवता येईल अतिरिक्त TDS, लिंक कसे करावे ते पहा