नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे तारीख का निवडली असावी.
सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी सार्वजनिक सुट्टी असते. २ तारखेला शनिवार आणि ३ तारखेला रविवार असल्यानेच नरेंद्र मोदींनी ३ मे ही तारीख निवडली आहे. करोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिलाय. दरम्यान, पुढील एक आठवडा लॉकडाउनचे नियम कठोर करणार असून प्रत्येक जिल्ह्यावर बारकाईने नजर ठेवणार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, २० एप्रिलपर्यंत प्रत्येक भाग, प्रत्येक स्टेशन, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्यांतील आकडेवारीचं बारकाईनं मूल्यांकन केलं जाईल. जे क्षेत्र या अग्निपरिक्षेत यशस्वी होतील, जिथं हॉटस्पॉटमध्ये वाढ होणार नाही तिथे काही सूट दिली जाऊ शकते. परंतु ही परवनागी सशर्त असेल. बाहेर पडण्याचे नियम अतिशय कडक असतील. लॉकडाऊनचे नियम तोडले गेले आणि करोनाचे रुग्ण आढळले तर सगळी शिथीलता परत घेतली जाईल. त्यामुळे आपण स्वत: बेजबाबदारपणा करता कामा नये आणि कुणाला करूही देता कामा नये, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
हे पण वाचा –
भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…
कहर कोरोनाचा! राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ४५५ वर
आणि माकडांनी स्विमिंगपूलवर ‘अशी’ केली मस्ती, व्हिडिओ व्हायरल
खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक