हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपीन्स जगभरात मुलांची पॉर्न इंडस्ट्री आणि मुलांच्या ऑनलाइन सेक्स रॅकेटसाठी कुख्यात आहे. कोरोनाव्हायरसमुळे, आता फिलिपिन्समध्ये लॉकडाउन सुरू आहे, ज्याचा थेट फायदा या कुख्यात उद्योगाला होत आहे. गरीबी आणि उपासमारीमुळे इथली परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की फक्त १० ब्रिटिश पौंडमध्ये म्हणजे ९६० रुपये देऊन पालक आपल्या स्वत: च्याच मुलांचे लैंगिक शोषण करीत आहेत आणि त्यांना ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग करत आहेत.
द सनच्या एका वृत्तानुसार फिलीपिन्समधून अशा लाइव्ह स्ट्रीमिंगची आणि चाइल्ड पोर्नची मागणी यूकेमध्ये सर्वाधिक आहे. फिलीपिन्समधील बहुतांश व्यवसाय लॉकडाउनमुळे बंद झाले आहेत, ज्यामुळे पैसे मिळवण्यासाठी पालकच आपल्या मुलांचे लैंगिक शोषण करत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक असे एक कुटुंब समोर आले होते ज्यामध्ये पालक त्यांच्या ५ मुलांचा लाइव इंटरनेटवर एकत्रित शोषण करीत होते. त्यासाठी ते दर तासाला सुमारे १००० रुपये कमावत होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबातील सर्वात लहान मुलाचे वय हे केवळ ३ वर्षाचे आहे. इंटरनेटवर हे असे लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्याही मोठी होती. लॉकडाऊन दरम्यान, फिलिपिन्सच्या या उद्योगात तीन पटीने वाढ झाली आहे.
हे व्हिडिओ ब्रिटनमध्ये सर्वात जास्त पहिले जात असल्याचे म्हटले जात आहे, आता या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी यूके नॅशनल क्राइम एजन्सी सक्रिय झाली आहे. याशिवाय अमेरिकन एजन्सी एफबीआय आणि युरोपोलदेखील या प्रकरणांचा तपास करत आहेत. इंटरनेट वॉच फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, केवळ ब्रिटनमधील लॉकडाऊन दरम्यान सुमारे ९ कोटी लोकांनी अशा प्रकारच्या चाइल्ड पॉर्न शोधण्यासाठी सर्च केला आहे. मुलांचे लाइव पॉर्न सर्च यूकेमध्ये सर्वाधिक केला जात आहे. यासाठी केवळ १० ब्रिटिश पाउंड ते ३० ब्रिटीश पौंड द्यावे लागतात.
नॅशनल क्राइम एजन्सीचे प्रमुख जॉन टॅनॅगो यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय न्याय मिशनने गेल्या ५ वर्षांत फिलिपिन्समधून मोठ्या प्रमाणात सेक्स ट्रॅफिकिंग केलेल्या मुलांना वाचवले आहे. जगभरातील अनेक देशातील लॉकडाऊनमुळे या उद्योगात अचानक तेजी दिसून येत आहे, जे या मुलांच्या भवितव्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. जॉन म्हणाले की,’ फिलीपिन्समध्ये चाइल्ड सेक्स-पोर्न उद्योग सर्वात मोठा आहे आणि येथे लोकांना त्यांच्या पसंतीनुसार व्हिडिओ किंवा लाइव्ह कंटेंट सहजपणे उपलब्ध केला जातो. त्यांचे ग्राहक हे बहुतेक वेळा पाश्चिमात्य देशातील असले तरी. सर्व पेमेंट ऑनलाइन आहेत आणि त्यासाठी अनेक बनावट पेमेंट वेबसाइट बनविल्या गेल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.