हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. गर्दी कमी होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोदींना पत्र’ ; केल्या ‘या’ पाच प्रमुख मागण्या…
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी नुकताच संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, किराणा तसेच भाजी खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आहे, असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊन आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आता प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. काही निर्बंध कडक केले जाऊ शकतात. लोकल प्रवासावर निर्बंध घातले जातील. तसेच सर्वसामान्यांनाही पेट्रोल मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच इंधन दिलं जाणार आहे.
धक्कादायक! वॉर्डबॉयने काढला ऑक्सिजन, तडफडून रुग्णाचा मृत्यू; घटना सिसिटीव्ही मध्ये कैद
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.