लाॅकडाउन इश्क! ड्रोनच्या मदतीने दिला मोबाईल नंबर अन् फुग्यात बसून केलं डेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरस संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास सगळ्याच देशात लॉकडाउन घेण्यात आला आहे.सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी लोकांना घरीच राहण्यास सांगण्यात येत आहे.अशातच जेरेमी कोहेंन नावाच्या युवकाने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीला खास स्टाईलने प्रोपोझ केले आहे.जेरेमीने काही दिवसांपूर्वीच ड्रोनच्या साहाय्याने त्या मुलीला आपला मोबाईल नंबर दिलेला होता. सगळ्यांत पहिले तर या युवकाने त्या मुलीला आपल्या घरातल्या बाल्कनीतून डान्स करताना पहिले.त्यानंतर जेरेमीला ती खूपच आवडली आणि त्याने ड्रोनच्या साहाय्याने आपला नंबर तिला दिला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.त्या व्यक्तीने आणखी एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.हा व्हिडीओ त्या मुलीबरोबरच्या पहिल्या डेटचा आहे.कोरोना व्हायरसमुळे जेरेमी एका फुग्यामध्ये बसून तिला भेटायला गेला होता. जेरेमीने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लिहिले आहे की”एका मोठ्या फुग्यात बसून तो टोरी सिग्नरेला भेटायला गेलेला. ही त्यांची पहिली डेट होती.”

 

जेरेमीने सांगितले कि काही दिवसांपूर्वीच त्याने या फुग्याची ऑर्डर दिली होती.त्याने याला एका कन्सेप्च्युअल आर्ट प्रोजेक्टसाठी ऑर्डर केले होते.त्याने सांगितले कि त्याने कुठलाही प्लॅन केलेला नव्हता. बस त्याला वाटलं कि याचा वापर करावा. हे कदाचित खूप कूल वाटेल.सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये जेरेमीने लिहिले की,”क्वारनटाईनच्या वेळी कसे डेट कराल…”

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि जेरेमीने या डेटसाठी पूर्ण तयारी केलेली होती. त्या मुलीला देण्यासाठी त्याने सुंदर असा एक फुलांचा गुलदस्ता पण घेतला होता. जेरेमी त्या मुलीला फुग्यात बसूनच भेटतो आणि दोघे नंतर वॉकिंगलाही जातात.जेरेमीने ट्विटरवर दोघांचा एक सुंदर असा फोटोही शेअर केला आहे.तुम्हांला सांगू इच्छितो की क्वारनटाईनच्या यावेळी लोकांना या दोघांची लव्ह स्टोरी प्रचंड आवडली आहे.सोशल मीडियावर या दोघांचे फोटोज आणि व्हिडीओज खूप व्हायरल होत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

 

Leave a Comment