मुंबई-पुण्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या ३ मे रोजी संपणार आहे. येत्या ४ मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. कदाचित या दोन्ही शहरांमधील कंटेन्मेंट झोनपर्यंत हा निर्णय मर्यादित असू शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लाइव्ह मिंट’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले कि, ”कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणानेच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण जर प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. सध्याच्या घडीला झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत, ही सध्याची चिंतेची बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास ३ मेनंतर फक्त मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो,” असं त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment