लॉकडाऊनचा हाॅटेल व्यवसायावर गंभीर परिणाम; ७० लाख नोकर्‍या व्हेंटिलेटरवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट इंडस्ट्रीला जोरदार फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या क्षेत्रात ७० लाख,३० हजार रोजगार धोक्यात आले आहेत. दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर देशात एकूण ४० दिवसांचा लॉकआउट झालेला असेल.तोपर्यंत रेस्टॉरंट उद्योगावर वाईटपणे परिणाम झालेला असेल.

इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईनच्या अहवालानुसार लॉकडाऊन सुरु असल्याने रेस्टॉरंट इंडस्ट्रीवरील ताण दर तासाने वाढतो आहे. स्किल्ड आणि सेमी-स्किल्ड लेबर्सपासून रियल इस्टेट क्रेडिट, ओवरहेड्स आणि यूटिलिटीज, डिलीवरी कमीशन और रेंटल कॉन्ट्रॅक्सची किंमत वाढत आहे.

शहरी भागातील वेगाने वाढणार्‍या रेस्टॉरंट उद्योगाला सध्या चांगलाच फटका बसला आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, इंदूर, अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये एकत्रितपणे ६५% कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दिल्लीचे ३३ आणि मुंबईतील ३०० झोन्स कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून, ते लवकरच उघडण्याची शक्यता फारच कमी आहे.

SPICE CIRCLE INDIAN RESTAURANT - LUOHU, Shenzhen - Restaurant ...

देशातील जवळपास ५ लाख रेस्टॉरंट्सना यावेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने मदत उपायांची अपेक्षा आहे. अन्यथा, त्यांचा व्यवसाय बंद होण्याची भीती आहे.देशातील बर्‍याच रेस्टॉरंट्सने आपल्या कर्मचार्‍यांना संपूर्ण मार्चसाठी पगार दिला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे उत्पन्नही कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत रेस्टॉरंट मालकांना खात्री नाहीये की ते एप्रिल महिन्यातही आपल्या कर्मचार्‍यांना पगार देण्यास सक्षम असतील की नाही.

भारतात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी सकाळी ताज्या आकडेवारीनुसार देशातील कोविड -१९ ने संक्रमित लोकांची संख्या १२,३८० एवढी झाली आहे.मंत्रालयाने म्हटले आहे की, “सध्या १०,४७७ लोक साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत, तर उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या एकूण १४८८ लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. कोविड -१९च्या संसर्गामुळे देशभरात ४१४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

The Taj - Indian Restaurant | Indian Restaurants in Costa Blanca Spain

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment