नवी दिल्ली |भाजपने या भूतो ना भविष्य असे बहुमत मिळवून ३०० जागांकडे मुसंडी मारली आहे. अशा परिस्थिती मध्ये भाजपच्या विजयाची कारण मीमांसा करण्यामध्ये विरोधी पक्षाचे नेते गर्क झाले आहेत. मात्र भाजपला हा एवढा दिव्य विजय कोणी मिळवून दिला याकडे देखील बारकाव्याने बघितले पाहिजे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचे मानण्यात येते आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीने भाजपला विजयी मार्गाकडे नेहले यात त्यांच्या कठोर निर्णयाची देखील जोड आहे यात शंका नाही.
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित ४८ खासदार ; बघा एका क्लिकवर
अमित शहा यांनी बिहार सारख्या राज्यता मागच्या निवडणूकीला २२ जागा जिंकून सुद्धा फक्त युती टिकवण्यासाठी तेथे १७ जागांवर लढणे उचित मानले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या अकार्यक्षम खासदारांना तिकिटांपासून वंचित ठेवून पक्षाला शिस्तीचे दर्शन घडवून आणले. या निर्णयाचा देखील अमित शहा यांना चांगला फायदा झाला. कारण ज्या खासदारांच्या नाकर्तेपणाचा जनतेच्या मनात रोष होता त्यांना भाजपने तिकिटच दिले नव्हते म्हणून त्यांना त्या जागा गमवाव्या लागल्या नाहीत.
भाजपचा गड ढासळला ; चंद्रपुरात कॉंग्रेसचे बाळू धानूरकर विजयी
उत्तर प्रदेशात जातीय समीकरणे जुळवण्यात अमित शहा यशस्वी झाले. तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी हिंदुत्वाचा चांगलीच फुंकर घातली. याचा फायदा त्यांना लोकसभेच्या जागा कायम राखण्यात झाला. तर तिकडे राजस्थान मध्ये भाजपने चांगलेच जातीचे कार्ड खेळले. गुज्जर समाजाच्या दोन नेत्यांना ऐनवेळी भाजपावाले बनवून अमित शहा यांनी या ठिकाणी मोठा करिष्मा दाखवून दिला. त्याचाच फायदा त्यांना या राज्यात पैकीच्या पैकी जागा मिळवण्यात झाला. अमित शहा यांनी ओडिसा, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यात आपला मोर्चा सहा महिने अगोदर वळवूनच तेथे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. ममता बॅनर्जी यांच्या दमनशाही राजकारणाला झुगारून अमित शहा यांनी त्या राज्यात देखील भाजपचे खासदार निवडून आणले. अशा सर्व मुसद्दी खेळयामुळे अमित शहाच भाजपच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले.
राष्ट्रवादीचा माढा भाजपने जिंकला ; मोहिते पाटलांच्या कष्टाला यश