मुलाच्या प्रचारासाठी अजित पवार भर उन्हात रस्त्यावर

1
49
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी 

मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तथा महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार भर  उन्हात पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर अवतरल्याचे आज पाहण्यास  मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार सध्या जीवाचे रान करत असल्याचे  चित्र राजकीय  वर्तुळात पाहण्यास मिळते आहे. त्याचेच एक उदाहरण आज पार्थ पवारयांच्या बाईक रॅलीच्या निमित्त पाहण्यास मिळाले आहे.

येथील भक्ती शक्ती  शिल्पाला वंदन करून अजित पवार  यांच्या उपस्थितीत पार्थ पवार यांच्या प्रचार रॅलीची सुरवात करण्यात आली. जिप्सीमधून अजित पवार आणि पार्थ पवार रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभा असणाऱ्या मतदारांना अभिवादन करत होते. पुण्याचे तापमान ४० अंशावर गेले असताना केवळ मुलाला निवडणुकीतविजयी करण्यासाठी अजित पवार जीवाचे रान करत असल्याचे दिसून आले.

पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्यासोबत सामना होणार आहे. श्रीरंग बारणे हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. तर त्यांच्या बद्दल जनमानसात असणारी लोकप्रियता पार्थ पवार यांच्या विजयाला अडसर ठरण्याची शक्यता आहे. अशा राजकीयपरिस्थितीत पार्थ पावर विरुद्ध श्रीरंग बारणे या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here