चंद्रपूर प्रतिनिधी | भाजपचा जिल्हा आणि भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. मात्र भाजपला या ठिकाणी धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर या ठिकाणी पराभूत झाले आहेत. तर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले आमदार बाळू धानुरकर विजयी झाले आहेत.
हंसराज अहिर यांना ४ लाख ०५ हजार ९७७ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या बाळू धानुरकर यांना ४ लाख ४९ हजार ७५० मते मिळाली आहेत. तर बाळू धानुरकर यांना ४३ हजार ७७३ मतांचे मताधिक्य मिळाले आहे.