LPG Cylinder Price : LPG गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त; महिलादिनी मोदींचं गिफ्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

LPG Cylinder Price : आज ८ मार्च म्हणजेच राष्ट्रीय महिला दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना मोठं गिफ्ट दिले आहे. गृहिणींसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या गॅसच्या किमतीमध्ये सरकारने तब्बल १०० रुपयांची कपात केली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. यापूर्वी सुद्धा रक्षाबंधनच्या दिवशी मोदींनी गॅस सिलिंडर स्वस्त केला होता.

आज सकासकाळी मोदींनी ट्विट करत म्हंटल, आज महिला दिनी आमच्या सरकारने LPG सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी (LPG Cylinder Price) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. . यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: आपल्या नारी शक्तीला फायदा होईल. स्वयंपाकाचा गॅस अधिक स्वस्त करून आम्ही कुटुंबांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचे देखील ध्येय ठेवतो. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी ‘आयज ऑफ लिव्हिंग’ सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.

सध्या कशा आहेत सिलेंडरच्या किमती – LPG Cylinder Price

यापूर्वी गॅस सिलेंडरच्या किमतीत ११०० वर गेल्या होत्या, मात्र ग्राहकांच्या नाराजीमुळे सरकारने सिलेंडरवर २०० रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. त्यानंतर 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईत 918.50 रुपये झाली. आता मोदींच्या घोषणेनंतर या दरात आणखी १०० रुपयांची कपात करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला ८०० रुपयांच्या आसपास गॅस सिलेंडर खरेदी करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.