हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder Price) दरात 50 रुपयांची वाढ झाली असून सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. या वाढीनंतर आता 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच शनिवार 7 मे 2022 पासून लागू झाली आहे.
मार्च 2022 मध्येही झाली होती 50 रुपयांनी वाढ- LPG Gas Cylinder Price
विशेष म्हणजे, याआधी मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरच्या नव्या दराप्रमाणे आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 999.50 रुपये असून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 2355 रुपये झाला आहे गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किमतीमुळे आता गृहिणींच्या बजेट वर परिणाम होणार आहे.
The price of 14.2 kg Domestic LPG cylinder increased by Rs 50 with effect from today. The domestic cylinder will cost Rs 999.50/cylinder from today.
— ANI (@ANI) May 7, 2022
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ-
एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दरात होणारी वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, यामुळे सामान्य जनतेचे जगणं मुश्किल झालं असतानाच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झालेलया वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत आहे.
हे पण वाचा :
महागाईचा दणका!! साबण, शाम्पूसह ‘या’ जीवनावश्यक वस्तू महागल्या
Flipkart Sale : 200 रुपयांपर्यंत मिळणार ‘या’ वस्तू; तुम्हीही करा खरेदी
गावात राहून सुरु करा ‘हे’ व्यवसाय; लाखोंची कमाई होईल
BSNL चा धमाकेदार प्लॅन: Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे
RBI चा मोठा निर्णय! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? कर्ज महागणार, EMI वाढणार अन बरंच काही…