RBI चा मोठा निर्णय! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? कर्ज महागणार, EMI वाढणार अन बरंच काही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी अचानक रेपो दरामध्ये 0.4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI ने हे पाऊल उचलले आहे. यामुळे गृहनिर्माण, वाहन आणि इतर कर्जांशी संबंधित मासिक हप्ता (EMI) वाढणार आहे. या वाढीमुळे रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ऑगस्ट 2018 नंतर पहिल्यांदाच पॉलिसी दरात वाढ करण्यात आली आहे. तसेच, आरबीआय गव्हर्नरच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीने (MPC) मुख्य व्याजदर वाढविण्याकरिता शेड्यूलशिवाय बैठक घेतल्याची ही पहिलीच घटना आहे. loan calculator

RBI ने रेपो दर ०.४ टक्क्यांनी वाढवल्याने सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

  1. आरबीआय कडून रेपोदरात वाढ करण्यात आल्याने आता कर्ज महागणार आहे.
  2. रेपो दरात वाढ झाल्याने आता सर्व बँकांचे व्याजदर वाढणार आहे.
  3. रिव्हर्स रेपो रेट मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  4. रशिया युक्रेन युद्धामुळे महागाईत वाढ होत असल्याचं बोललं जात आहे.
  5. युद्धामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम पुरवढ्यावर झाला आहे.
  6. देशात फूड इन्फ्लेशन म्हणजेच अन्नधान्याच्या किमती यापुढे अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  7. खाद्य तेलाच्या किमतीही वाढणार

चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रोख राखीव प्रमाण (CRR) 0.50 टक्क्यांनी वाढवून 4.5 टक्के करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामुळे बँकांना अतिरिक्त रक्कम मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागेल, ज्यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांना कर्ज देण्यासाठी कमी पैसे उपलब्ध होतील. पॉलिसी रेटमध्ये वाढ झाल्याबद्दल माहिती देताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, CRR वाढल्यामुळे बँकांमधील रोकड 87,000 कोटी रुपयांनी कमी होईल.loan calculator

तसेच, मुदत ठेव सुविधा दर आता 4.15 टक्के असेल तर सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर 4.65 टक्के असेल. मात्र, एमपीसीनेही आपली उदारमतवादी भूमिका कायम ठेवली आहे. उच्च किमती दीर्घकाळ टिकून राहण्याचा धोका आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीसाठी चलनवाढ रोखणे आवश्यक आहे असे दास यांनी म्हटले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आणि साथीच्या रोगाशी निगडीत पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सलग तिसऱ्या वर्षी महागाई वाढली आहे. एकूण चलनवाढीचा दर मार्चमध्ये उच्चांकी 6.95 टक्क्यांवर पोहोचला आणि एप्रिलमध्येही जास्त राहण्याची शक्यता आहे. दोन टक्के चढ-उतारांसह चलनवाढीचा दर चार टक्क्यांच्या श्रेणीत ठेवण्याची जबाबदारी आरबीआयवर सोपवण्यात आली आहे.

एमपीसीची पुढील बैठक 8 जून रोजी प्रस्तावित आहे. रेपो दरात आणखी 0.25 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महागाईची परिस्थिती लक्षात घेऊन, योग्य आणि वेळेवर पावले उचलणे गरजेचे आहे. आरबीआयच्या अचानक केलेल्या बदलांमुळे BSE सेन्सेक्स 1,307 अंकांनी घसरला.

RBI च्या या निर्णयामुळे एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) प्रभावित होतील. तसेच, 2019 च्या खाली असलेल्या पत वाढीवरही परिणाम होईल. आर्थिक घडामोडींवरही परिणाम होईल.” यापूर्वी, केंद्रीय बँकेने 22 मे 2020 रोजी कोणत्याही निश्चित वेळापत्रकाशिवाय रेपो दरात सुधारणा केली होती. याअंतर्गत मागणी वाढवण्याच्या उद्देशाने रेपो दर चार टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आणण्यात आला होता.

हे पण वाचा –

Bajaj CT 100 : किंमत एकुण तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 लिटर पेट्रोलमध्ये 90 कि.मी. जाते

परदेशात शिक्षण घेऊन भारतात आला, आता ‘या’ फळाची शेती करुन कमावतोय लाखो..1200 रु किलो ने विक्री

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या घरी चालत होतं सेक्स रेकेट? ‘या’ माॅडेलने केले खळबळजनक आरोप

इलेक्ट्रिक विमान ते चंद्रावर शहर… ; एलोन मस्क यांच्या डोक्यातील ‘या’ 5 कल्पनांचा तुम्ही विचारही केला नसेल

Bank Of India च्या ग्राहकांना झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात