LPG Subsidy : LPG सिलेंडरवर सबसिडी उपलब्ध आहे की नाही अशा प्रकारे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एलपीजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सात वर्षांत किंमती दुपटीने वाढल्या आहेत. मात्र, यादरम्यान ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. होय.. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात आहे. सबसिडीचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. माहितीनुसार, आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी म्हणून देण्यात येत आहे.

मात्र, काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सबसिडी मिळत आहे. अशा स्थितीत याबाबत संभ्रम कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या खात्यात सबसिडी दिली जात नसल्याची प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, आता तक्रारी येणे बंद झाले आहे.

अशाप्रकारे तपासा
गॅस सबसिडीचे पैसे तपासण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाद्वारे आणि दुसरा एलपीजी आयडीद्वारे, जे तुमच्या गॅस पासबुकमध्ये लिहिलेले आहे. चला तर मग त्यासाठीची प्रक्रिया काय आहे जाणून घेऊयात…
1. सर्वप्रथम तुम्ही http://mylpg.in/ वर जा आणि तेथे LPG सबसिडी ऑनलाइन वर क्लिक करा. येथे तुम्हाला तीन एलपीजी सिलेंडर कंपन्यांचे टॅब दिसतील. तुमचा सिलेंडर ज्या कंपनीचा आहे त्यावर क्लिक करा. समजा तुमच्याकडे इंडेन गॅसचा सिलेंडर आहे तर Indane वर क्लिक करा.

2. यानंतर, Complaint पर्याय निवडल्यानंतर, Next बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस उघडेल, ज्यामध्ये तुमचे बँक डिटेल्स असतील. या डिटेल्सवरून तुम्हाला समजेल की, सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात येत आहेत की नाही.

सरकार सबसिडी वर किती खर्च करते?
2021 या आर्थिक वर्षात सबसिडीवरील सरकारचा खर्च 3,559 रुपये होता. आर्थिक वर्ष 2020 मध्ये हा खर्च 24,468 कोटी रुपये होता. वास्तविक ही DBT योजनेअंतर्गत आहे, जी जानेवारी 2015 मध्ये सुरू झाली होती, ज्या अंतर्गत ग्राहकांना विनाअनुदानित LPG सिलेंडरची संपूर्ण रक्कम भरावी लागते. त्याचबरोबर सबसिडीचे पैसे सरकारकडून ग्राहकांच्या बँक खात्यात रिफंड केले जातात. हा रिफंड डायरेक्ट असल्याने योजनेला DBTL असे नाव देण्यात आले आहे.

Leave a Comment