मुंबई प्रतिनिधी | राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडया तीन राज्यात भाजपला चांगलीच शिकस्त देत काँग्रेस या ठिकाणी सत्ता रूढ झाली. त्याच निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात देखील होईल असेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दोन्ही पक्षाच्या गोटातून काढली आहे. शिक्षण, बेरोजगारी , शेतकरी आत्महत्येवर उपाय शोधण्यास विद्यमान शिवसेना भाजप सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे यावेळी सरकार आपलेच येणार आहे अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते लावून बसले आहेत.
राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुकीला भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवाचा लोकसभा निवडणुकीवर कसलाच परीणाम झाला नाही. कारण राजस्थान मधील सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या. तर मध्य प्रदेशात काँग्रेसला फक्त एकमेव जागा जिंकता आली. अशा अवस्थेत महाराष्ट्रात याच्या उलटी स्थिती होईल असे काँग्रेसला वाटते. राज्य सरकारच्या नेतृत्वात आणि येथील सरकारने घेतलेल्या निर्णयावर जनता खुश नाही. त्यामुळे आपल्या कडे सत्ता जनता सोपवेल असा भविष्यकालीन अंदाज काँग्रेस नेते बांधत आहेत.
काँग्रेसला सत्तेचे जे गोड स्वप्न पडले आहे त्या स्वप्नात काय तथ्थ आहे का? या बद्दल राजकीय जाणकारांना विचारले असता त्यांनी या संदर्भात सांगितले की , असे भविष्याचे अंदाज बांधत बसण्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कामाला लागावे. जेणेकरून त्यांची होणारी वाताहत कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे काँग्रेसला जे वाटते त्यात काहीच तथ्थ नसून भाजपसेना पुन्हा सत्तेत येईलच असे मत राजकीय जाणकर व्यक्त करत आहेत.