आघाडी सरकार लवकरच पडेल हे आठवीतला मुलगाही सांगेल : चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यानंतर आज विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केलेला असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकार पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. ठाकरे सरकार पडणारच, हे इयत्ता आठवीतला मुलगाही सांगू शकेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लानिंग नाही. सरकारमध्ये विल पॉवर कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. इयत्ता आठवीतला मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असं पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेलं पॅकेज फसवं आहे. या सरकारने दीड हजार रुपये मदत देऊन गोरगरिबांची चेष्टा केली आहे. दीड हजारात कुटुंबाचा खर्च चालतो का? असा सवाल त्यांनी केला. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. हे आम्ही आधीपासून सांगतोय. कोरोनाची साखळी तोडलीच पाहिजे. परंतु, गडी, हमाल, माथाडी कामगार, व्यापारी हा वर्ग मोठा आहे. त्याचा या पॅकेजमध्ये विचार करण्यात आलेला नाही, असंही ते म्हणाले.

राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा रद्द होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही, असंही ते म्हणाले. ऑक्सिजन नसल्यामुळे डॉक्टर रडले. सरकारने आरोग्य यंत्रणेचं काहीच प्लानिंग केलं नाही. आम्ही आमदारांच्या विकास निधीतले चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे होते. तेही केलं नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे, असं ते म्हणाले.

You might also like