सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापूरला आले असता त्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला दोन आमदारांनी दांडी मारल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. तसेच यांच्या गैरहजेरीने राष्ट्रवादीमध्ये खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल राष्ट्रवादीच्या मुलाखतीला गैरहजर राहिले. त्यामुळे ते राष्ट्रवादीला रामराम करणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
२७ जुलै रोजी छगन भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश!
माढ्याचे आमदार बबन शिंदे हे यावेळी विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. त्यांच्या बदल्यात त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढायला इच्छुक आहेत असे बोलले जाते आहे. त्यांनी यासाठी आत्तापासूनच भाजपकडे विचार विमर्श करण्यास देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये सामावून घेऊन भाजपची उमेदवारी दिली जाणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे. त्यांच्या जागी माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील देखिले इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे भाजप कोणाला संधी देणार हे बघण्यासारखे राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पार्थ पवारांचे होणार कमबॅक
बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे देखील राष्ट्रवादीच्या निष्ठेबद्दक तळ्यात मळ्यात असणारे नेतेच आहेत. त्यांनी देखील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाच्या बातम्या मागच्या काही दिवसात माध्यमात झळकत होत्या. तेव्हा त्यांनी पक्ष सोडण्याची कसलीच इच्छा नाही. आपण राष्ट्र्वादीतच राहणार आहे असे म्हणले होते. मात्र त्यांनी आता इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारल्याने तेच राष्ट्रवादी कडून इच्छुक नाहीत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आशा सर्व पारिस्थितीत आगामी काळात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथं होण्याची शक्यता आहे.