औरंगाबाद प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला सर्वच पक्ष जोमानेभिडत असताना आता छोट्यापक्षांनी देखील निवडणुकीला चांगलाच रंग भरायला सुरुवात केली आहे. आज औरंगाबाद येथे संभाजी ब्रिगेडने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे ब्रिगेडने जाहीर केली आहेत.
२२ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयावर एकमत झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या नावावर चाचपणी झाली आणि १५ जागांची नावे फायनल करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांनी या निवडणुकीच्या कार्यक्रमात पुढाकार घेतला आहे.
दरम्यान आज औरंगाबाद या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी यावेळी आम्ही मागची अनेक वर्ष दुसऱ्यासाठी निवडणुका लढलो मात्र आता आम्ही स्वतःसाठी निवडणुका लढणार असल्याचे म्हणले. संभाजी ब्रिगेडचे निवडणूक चिन्ह शिलाई मशीन आहे. शिलाई मशीन या विधानसभेच्या निवडणुकीत कशी चालते हे आता बघण्या सारखे राहणार आहे.
संभाजी ब्रिगेडची विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी :
- कारंजा (वाशिम) माणिकराव महादेव पावडे
- आर्वी) (वर्धा) अशिष नरसिंगराव खंडागळे
- देवळी) (वर्धा) राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे
- गडचिरोली (गडचिरोली) दिलीप किसनराव मडावी
- ब्रह्मपुरी (चंद्रपूर) जगदीश नंदूजी पिलारे
- वरोरा(चंद्रपूर) अरुण नामदेवराव कापडे
- भोकर (नांदेड) भगवान भीमराव कदम
- नांदेड उत्तर (नांदेड ) धनंजय उत्तमराव सूर्यवंशी
- जिंतूर (परभणी) बालाजी माधवराव शिंदे
- श्रीगोंदा(अहमदनगर) टिळक गोपीनाथराव भोस
- उस्मानाबाद(उस्मानाबाद) डॉ.संदीप माणिकराव तांबारे
- म्हाडा(सोलापूर) दिनेश गोपीनाथराव जगदाळे
- सोलापूर उत्तर(सोलापूर) सोमनाथ विजय राऊत
- पंढरपूर(सोलापूर) किरण शंकरराव घाडगे
- तासगाव कवठेमहाकाळ (सांगली)ऋतुराज जयसिंगराव पवार