राज्य मंत्री मंडळाचा उद्या विस्तार ; ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्री पदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित आसा राज्य मंत्री मंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे. उद्या रविवारी सकाळी ११ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे या नेत्यांचा मंत्री मंडळ विस्तारात समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच राजभवनाच्या गार्डनवर हा शपथविधी सोहळा पार पडणार असून २५० ते ३०० लोकांच्या बैठकीची व्यवथा या ठिकाणी करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी मंडप उभारणीचे काम सुरु आहे.

 राज्य मंत्री मंडळातील सात जागा रिक्त आहेत. या मंत्री  पदावर नेमके कोणते चेहरे दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. तर शिवसेनेच्या कोठ्यातून  जयदत्त क्षीरसागर तर भाजपच्या कोठ्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्री मंडळात समावेश करून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल असे बोलले जाते आहे.

दरम्यान पुढील आठवड्यात राज्य विधी मंडळाचे शेवटचे अर्थात पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. तर धनंजय मुंडे यांच्या इनामी जमीन बळकावण्याच्या प्रकरणामुळे विरोधकांची धार बोथट झाली आहे.