‘…हा तर संविधानाचा अपमान’, मुख्यमंत्री कार्यालयातील पुजेवरून अमोल मिटकरींची टीका

Amol Mitkari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भुकंपानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मागच्या गुरूवारी या दोघांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे eknath shinde) आज पहिल्यांदाच त्यांच्या शासकीय कार्यालयात आले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारण्याआधी पूजा केली आणि मगच कार्यालयात प्रवेश केला. पण आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या पुजेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) आक्षेप घेत या गोष्टीचा निषेध केला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी ?
‘एकनाथ शिंदे eknath shinde) धार्मिक आहेत, याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण महाराष्ट्राचं शासकीय कामकाज भारतीय संविधानावर चालतं. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पूजा आणि विधीचे अधिकार आपल्या घरातच असावेत. सेक्युलर राष्ट्रामध्ये पूजा केली जात असेल, तर हे निंदनीय आहे. शासकीय कार्यालयात धार्मिक विधी होता कामा नये, हा संविधानाचा अपमान आहे,’ अशी टीका करत त्यांनी या गोष्टीचा विरोध केला आहे.

एकनाथ शिंदे eknath shinde) जेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री कार्यालयात आले तेव्हा त्यांचं कुटुंबियही त्यांच्यासोबत होतं. एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू सुद्धा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित होते.

हे पण वाचा :
गेल्या पाच वर्षांत ‘या’ शेअर्सने दिला 450% रिटर्न, गुंतवणूकदार झाले मालामाल

‘या’ अभिनेत्याचं अल्पवयीन मुलींसमोर पार्कमध्ये अश्लील कृत्य; POCSO कायद्यांतर्गत पोलिसांकडून अटक

LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे फक्त 150 रुपयांमध्ये मिळवा 19 लाख रुपये !!!

भरधाव ट्रेनची ट्रकला धडक; अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

‘या’ 5 शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला भरघोस नफा !!!