महाराष्ट्रात करोनाग्रस्तांचा आकडा ११६वर- आरोग्यमंत्री राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढली असून ती आता १०७ वरुन ११६ वर गेली आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार दुपार या कालावधीत राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत ९ जणांची भर पडली आहे. त्यापैकी आज सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. तर ४ जण मुंबईतील आहेत. मुंबई येथे ४ सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, १४ करोनाग्रस्त सदस्य हे डिस्चार्जच्या प्रक्रियेत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता ९ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.