नांदेड प्रतिनिधी / नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, आमचं सरकार आलं तर आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ. नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीची पहिलीच सभा काल घेण्यात आली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. नोटा बंदीचा व्यापाऱ्यांना खूप मोठा तोटा झाला, त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच बऱ्याच व्यापाऱ्यांकडे अजूनही जुन्या नोटा असल्याचे मला माहित आहे. त्यामुळे आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ असं आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी प्रचार सभेत बोलताना दिल.
‘या चोरांचं सरकार परत येऊ देऊ नका’ असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारसभेत बोलताना केले. वंचित बहुजन आघाडी राज्यलातील ४७ जागा लढणार आहे. सोलापूर आणि अकोला येथून प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणूक लढणार आहेत.
इतर महत्वाचे –
पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले
भाजप महाराष्ट्रात ‘या’ जागेचा उमेदवार बदलणार?