मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणूका काही दिवसातच पार पडणार आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होईल. ७ जागांसाठी ११ एप्रिलला पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची प्रचारासाठी लगबग सुरु झाली आहे. भाजपकडून महाराष्ट्रात २५ मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत, यासाठी भाजपची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यातील काही सभांसाठी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात प्रचारासाठी भाजपकडून पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज नेते मंडळी येणार असल्याने भाजपचे कार्यकर्ते उत्साहात दिसत आहेत.
शिवसेना आणि भाजप युतीची जाहीर सभाही होणार आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे बऱ्याच काळानंतर एका व्यासपीठावर दिसतील. या सभेचं ठिकाण आणि तारीख अद्याप निश्चीत झाले नाही.
इतर महत्वाचे –
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव मुटकुळे यांना देशसेवा पुरस्कार प्रदान
अहमदनगरमध्ये अरुणोदय होणार की पुन्हा कमळ फुलणार ?
शिवसेनेचा कोल्हापूरचा वाघ स्वगृही परत
सोशली उतावीळ बहाद्दरांचा बंदोबस्त करणार – विश्वास नांगरे पाटील