साताऱ्यात उदयन राजेंना भाजपकडून प्रतिस्पर्धी कोण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | साताऱ्यात अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले निवडून येत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप ने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी यासाठी त्यांचे नाव पुढे आले आहे.

साताऱ्यात उदयनराजे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकही भारदस्त उमेदवार नाही. पण साताऱ्यात माथाडी कामगार जास्त असल्यामुळे पाटील हे योग्य उमेदवार ठरू शकतात आणि भाजपला याचाच फायदा होऊ शकतो, या उद्देशाने भाजप हा निर्णय घेऊ शकते. नरेंद्र पाटील यांची उमेदवारी पक्की करण्यासाठी भाजप मध्ये चर्चा सुरु आहे.

उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीत असले तरी त्याचे फक्त शरद पवार यांच्याशीच चांगले जुळते. मागील काही दिवसात उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईला भेटले तसेच त्यांचे कौतुक केले. त्यामुळे ते भाजपमध्ये जातात की काय अशी शंका होती, मात्र शरद पवार यांनी त्यांची मनधरणी केली. राष्ट्रवादीकडून खासदारकीसाठी त्यांची उमेदवारी पक्की केली.

इतर महत्वाचे –

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

IMG-20190220-WA0005.jpg

Leave a Comment