राधाकृष्ण विखे पाटील देखील करणार भाजपमध्ये प्रवेश ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून इच्छुक असणारे डॉ. सुजय विखे पाटील शरद पवारांच्या राजकारणा कंटाळून भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांना तिकडे लोकसभेची उमेदवारी देखील दिली गेली.मात्र  मुलानंतर राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार का ? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेद्र मोदी यांच्या प्रचार सभेवेळी  राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता  आहे.

राधाकृष्ण विखे पाटील सध्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्यास कॉंग्रेस समोर मोठे आव्हान उभा राहण्याची शक्यता आहे. राधा कृष्ण विखे पाटील भाजपमध्ये  दाखल  झाल्यास नगर जिल्ह्यात भाजपची ताकद दुप्पट होणार आहे.

राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये दाखल झाले तर  पुत्र सुजय विखे पाटील  यांचा प्रचार करण्यास त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. तसेच भाजपमध्ये प्रवेश करून सुजयचा  प्रचार करणे उचित  राहील असे विखे पाटील यांच्याकडून  निर्धारित करण्यात आले आहे  अशी माहिती सूत्रांनी दिली  आहे. जर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले तर कॉंग्रेस आघाडीला मिळणाऱ्या मतांमध्ये राज्यभर मोठी घट होण्याची शक्यता आहे

 

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ ; हर्षवर्धन-विजयसिंह यांच्यात भेट

दुसरा मोदी  तयार होऊ नये याची मी काळजी घेतो आहे : शरद पवार

धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते :पंकजा मुंडे

पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले

मुलाच्या प्रचारासाठी अजित पवार भर उन्हात रस्त्यावर

जळगाव : भाजपच्या अडचणीत वाढ ; स्मिता वाघ यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट

Leave a Comment