महाराष्ट्रातील ‘या’ जागेचा निकाल लागणार सर्वात आधी

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून येत्या २३ तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत सर्वात वेगवान निकाल हा गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा लागण्याची शक्यता आहे. कारण या मतदार संघात भाजप आणि काँग्रेस यांच्या सह अवघे पाच उमेदवार रिंगणात आहेत.

पुण्यात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’

जेवढे कमी उमेदवार तेवढा निकाल वेगवान असे सूत्र साधारणता मानले जाते. कारण कमी उमेदवार असल्यास मतांचे ध्रुवीकरण कमी प्रमाणात होते. तसेच मत मोजणी करण्यास वेग येतो. गडचिरोली मतदारसंघा पाठोपाठ सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडचिरोली मतदारसंघात दुपारी १ वाजता निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे.

मी नरेंद्र मोदींचा द्वेष करतो कारण ते प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत : मुख्यमंत्री

गडचिरोली सातारा या मतदारसंघा पाठोपाठ लातूर, नंदूरबार, रत्नागिरी, पालघर या मतदारसंघाचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे गडचिरोली सारख्या दुर्गम भागाने घरातून बाहेर ननिघणाऱ्या शहरी मतदारांच्या तोंडात चपराक मारली आहे असे देखील बोलले जाते आहे. तर सर्व देशालाच २३ मे या निकालाच्या दिवसाची उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या 

आश्चर्य !चक्क डान्स करत चोरांनी केली ३ लाखांची चोरी ; चोरांचा डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

धक्कादायक ! पाणी पुरवठ्याच्या नळामधून आले मृतप्राण्यांचे अवयव

स्मृती इराणींनी प्रदर्शित केलेला तो व्हिडीओ खोटा : निवडणूक आयोग

ब्रेकिंग ! मिलिंद एकबोटे यांच्यावर चाकूने हल्ला

एफआरपीचे २८१ कोटी रुपये थकित; १ जूनपर्यंत व्याजासह रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन