..म्हणून ऐनवेळी भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी चौथा उमेदवार बदलला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पक्षात नव्यानं सामील झालेल्यांना विधानपरिषद निवडणुकीची उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर होता. ही नाराजी काही प्रमाणात दूर करण्यासाठी भाजपने मागील आठवड्यात अर्ज दाखल केलेले डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन काल अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांचा अर्ज कायम ठेवला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी ऐनवेळी चौथा उमेदवार बदलल्यानं रमेश कराड आता भाजपचे चौथे उमेदवार असतील. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबतच भाजपकडून रमेश कराड यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने अचानक डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केलं.

मागील आठवड्यामध्ये भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे या चार उमेदवारांची विधानपरिषद निवडणुकीसाठी नावे जाहीर केली होती. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे हे चार अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्ट झाले होते. मात्र काल अचानक भाजपकडून रमेश कराड आणि संदीप लेले यांचे अर्ज दाखल करण्यात आले. याआधी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांपैकी एखादा अर्ज बाद झाला तर अडचण नको त्यामुळे म्हणून खबरदारी म्हणून काल दोन अर्ज भरण्यात आले होते. लेले आणि कराड यांचे अर्ज डमी असतील, आणि या दोघांचे अर्ज मागे घेतले जातील अशी काल चर्चा होती.

मात्र आज अर्ज छाननीनंतर भाजपने रमेश कराड यांच्याऐवजी दोन अर्ज डमी असत डॉ. अजित गोपछडे आणि संदीप लेले यांचा अर्ज मागे घेऊन धक्कातंत्राचा अवलंब केला. या धक्कातंत्रा मागेही काही कारणं दडलेली आहेत. एकतर नुकतेच पक्षात आलेले रणजितसिंह मोहिते पाटील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात भुमिका घेणारे गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी देताना पक्षातील इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांना डावललं होतं. पंकजा मुंडे यांना डावलल्याने त्या स्वत: नाराज होत्याच. मात्र वंजारी समाजही भाजपवर प्रचंड नाराज होता. वंजारी समाजाची नाराजी दूर करण्यासाठीच पक्षाने वंजारी समाजाचे रमेश कराड यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

कोण आहेत रमेश कराड?
रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत.
रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.
लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला.

...आणि असे झाले रमेश कराड विधान परिषदेचे आमदार

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment