पुणे । राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे.
33 new #Coronavirus positive cases reported in Maharashtra today – 19 in Pimpri-Chinchwad, 11 in Mumbai, 1 each in Ahmednagar, Satara and Vasai. Total number of positive cases in the state now stands at 781: Maharashtra State Health Department
— ANI (@ANI) April 6, 2020
तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं झोप उडावी अशी माहिती जाहीर केली आहे. त्यातून देशात करोनाचा संसर्ग वाढला असल्याचेही संकेत मिळत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या १२ तासात देशात ४९० नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांचा आकडा आता ४ हजार ६७ इतका झाला आहे.
Increase of 490 #COVID19 cases in the last 12 hours, India’s positive cases cross 4000 mark – at 4067 (including 3666 active cases, 292 cured/discharged/migrated people and 109 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/d5xHg53Y3M
— ANI (@ANI) April 6, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग
कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क
शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार