ही ‘ईडी’चं भाजपला संपविल्याशिवाय राहणार नाही! धनंजय मुंडेंचा घणाघात

पुणे । भाजपला (BJP) हिचं ‘ईडी’ (ED) संपविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत श्रवणयंत्र वाटपाचा हा कार्यक्रम जलसंपदा मंत्री … Read more

‘मी फडणवीसांवर नाराज असलो तरी…’; ‘पवार’ भेटीनंतर जानकरांची खदखद

बारामती । राज्यातील महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. ‘माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार,’ असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

पुणे पदवीधरमध्ये भाजप स्वतःच्याच सापळ्यात अडकली; ‘ही’ खेळी आली अंगलट

पुणे । भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने यंदा खेचून घेतली. चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेषत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे पुण्यातून पाटील यांना झटका बसल्याचे यातून स्पष्ट झाले. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार … Read more

‘चंद्रकांत पाटलांचा विनोदी विधान करणाचा लौकिक’; निकालानंतर शरद पवारांचा चिमटा

पुणे । पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे-नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. हा भाजपाला मोठा धक्का समजला जात आहे. तर औरंगाबाद मतदार संघातही महाविकास आघाडीने विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा … Read more

पुणे-नागपूर मतदारसंघातील विजय म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा महाविकास आघाडीला पाठींबा – शरद पवार

पुणे । पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे-नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. हा भाजपाला मोठा धक्का समजला जात आहे. तर औरंगाबाद मतदार संघातही महाविकास आघाडीने विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. ”पुणे, नागपूर … Read more

पुण्यात राष्ट्रवादीच्या अरूण लाडांनी केलं भाजपच्या संग्राम देशमुखांना ‘ओव्हरटेक’; मतमोजणीत भक्कम आघाडी

पुणे । पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून सगळ्यांचे लक्ष असलेल्या पुण्यात सुरुवातीच्या टप्प्यात महाविकास आघाडीची सरशी होताना दिसत आहे. काहीवेळापूर्वीच याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 65 ते 70 हजार मतांची छाननी झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण लाड हे भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यापेक्षा 10 हजार मतांनी पुढे आहेत. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही … Read more

पुण्यात महाविकास आघाडीचा निकालाआधीचं जल्लोष! अरुण लाड यांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

पुणे । राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार या निवडणुकीच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. यामध्ये पुणे पदवीधर (Pune constituency) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun lad) यांनी मुसंडी मारल्याचं … Read more

शिक्षक-पदवीधर जागांचा आज निकाल; भाजप कि महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?

पुणे । राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी (Graduate Constituency Elections) आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी सर्वानी तरुणाईला साद घातली पाहिजे- रवींद्र धनक

पुणे |  महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे, फुले वाडा येथे घेण्यात आलेल्या फुले आंबेडकर व्याख्यानमालेचा सोमवारी तारीख 30 हा तिसरा दिवस पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र धनक वक्ते छाया कावीरे, जितेंद्र पवार,अश्फाक कुरेशी होते. या व्याख्यानमालेत ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यथा व कथा या विषयावर बोलताना रविंद्र धनक म्हणाले जेव्हा ग्रामीण तरुणांचा प्रश्न येतो पहिला प्रश्न … Read more