‘हा कुठला अर्थसंकल्प हे तर केवळ राजकीय भाषण होतं!’- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यांनतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारनं आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हे केवळ पोकळ राजकीय भाषण आहे अशी टीका केली.

”अर्थसंकल्पाच्या नावाखाली अजित पवार यांनी पोकळ भाषण केलं. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कुठलीही आकडेवारी नव्हती. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण नव्हतं. नवीन वर्षात काय अपेक्षित आहे. किती तूट राहील किंवा अधिक्य राहील अशा कुठल्याही गोष्टी या अर्थसंकल्पात नाहीत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधत महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. ”अर्थमंत्र्यांना विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे राज्यात येतात याचा विसर पडला आहे. या विभागांसाठी काहीही देण्यात आलं नाही, कोकणाचे नाव घेतले असले तरी, कोकणाच्या तोंडालाही पान पुसण्यात आली आहेत” असंही फडणवीस म्हणाले.

”या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला सुद्धा पानं पुसली आहेत. कर्जमाफीची घोषणा करत असताना, मुदत कर्जाच्या संदर्भात कुठलीही घोषणा केली नाही. त्यामुळं शेतकऱ्याचा सातबारा कोरा होऊच शकत नाही, ”असं ते म्हणाले. २ लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. आम्ही दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारची घोषणा केली. त्यावेळी आमच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण आता हीच घोषणा सरकारने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार, ५० हजार आणि एक लाख रुपये मदत देण्याचं वचन दिलं होतं. मात्र, सरकारला सत्तेच वचन लक्षात आहे पण शेतकऱ्यांना ते विसरले” अशी टीका फडणवीस यांनी केली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment